There is no item in your cart
There is no item in your cart
सेंद्रिय गुळाची निर्मिती करताना त्यात कोणतेही रसायने किंवा केमिकल्स वापरले जात नाही. सेंद्रिय गूळ हा रसायने असलेल्या सामान्य गुळापेक्षा आरोग्यासाठी अधिक चांगला असतो. तसेच अधिक गुणवत्तापूर्ण सेंद्रिय गुळ बनवण्यासाठी सेंद्रिय शेतीतील उसाचा वापर केला जातो.
सेंद्रिय गुळामध्ये आवश्यक असणारे अनेक पोषक घटक असतात.सेंद्रिय गुळामध्ये लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम,मॅगनीज, विटामिन बी, कॅल्शियम, जस्त, फॉस्फरस व तांबे यासारखे अनेक महत्त्वाचे पोषक तत्वे असतात.
गूळ औषधी गुणधर्मयुक्त आणि शरीरासाठी पोषक आहे. एक वर्ष जुना आणि कोणतीही रासायनिक प्रक्रिया न करता बनवलेला गूळ हा शरीरास हितकारक आहे. गूळ पाचक द्रव्यांना उत्तेजित करतो. त्यामुळे पचन सुधारतं. गूळ श्वसननलिका, फुफ्फुस, पोट आणि आतडे यांतील अशुद्धींना बाहेर काढतो. गूळ हा झिंक, मॅग्नेशियम, पोटॅशियम, सिलेनियम अशा आवश्यक घटकांचा स्त्रोत आहे.